शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा -धैर्यशील माने यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:30 IST

कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे.

ठळक मुद्दे कुरुंदवाड येथे उपोषण; प्रदूषण नियंत्रण मंडळावर टीकास्त्र

कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पंचगंगा गटारगंगा बनली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण नियंत्रणाचे काम करीत नसून, तडजोडीचे काम करीत आहे. त्याचे पाप पंचगंगाकाठच्या नागरिकांना भोगावे लागत असून, नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी केले.

पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने येथील नगरपालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी माने बोलत होते. प्रारंभ समितीचे पदाधिकारी व पंचगंगाकाठच्या नागरिकांनी तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर नदीपात्रात उतरून जलपर्णी घेऊन व मानवी विळखा घालून नदी प्रदूषण करणाºया घटकांचा व प्रशासनाचा निषेध कला. त्यानंतर येथील पालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, रामभाऊ मोहिते, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, आप्पासोबंडगर, विलास कांबळे, सतीशभंडारे, आदींनी आंदोलन यशस्वी होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.यावेळी कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, साधना मंडळाचे जयपाल बलवान, दीपक पोमाजे, सुनील कुरुंदवाडे, कृष्णा लोकरे, दीपक गायकवाड, अभिजित पाटील, मधुकर सासणे, विश्वास बालिघाटे, किरण आलासे यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.माणगाव बंद उद्यारुकडी माणगाव : पंचगंगा बचाव कृती समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माणगाव (ता. हातकणंगले) येथे उद्या, रविवारी गावबंद व जागृती फेरीसह साखळी उपोषण करण्याचे येथील महादेव मंदिरात झालेला सर्वपक्षीय बैठकीत जाहीर करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी पाटील होत्या.पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी रुकडी येथे पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीने दि. १ जूनपासून पुकारण्यात आलेल्या साखळी उपोषणाची दाहकता वाढत असून, हातकणगंले व शिरोळ तालुक्यांत या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे. या उपोषणामध्ये माणगाववाडीचे ग्रामस्थही सहभागी होणार असल्याची माहिती झाकीर भालदार यांनी दिली.पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने तेरवाड येथील पंचगंगा नदीला मानवी विळखा घालताना जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने, विश्वास बालिघाटे, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, विलास कांबळे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.